मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली कोल्हापूरकरांच्या भावनांची दखल
महादेवीच्या घरवापसी बद्दल मुख्यमंत्र्यांनी उद्या मुंबईत बोलावली बैठक

नांदणीतील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा इथं हलवल्यानंतर जैन धर्मीयांसह सर्व समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागलाय. कालच्या नांदणी ते कोल्हापूर या मूक पदयात्रेच्या निमित्तानं महादेवीला परत मठात आणावं या मागणीसाठी लोटलेला जनसागर बघून राज्य सरकारला जनभावनांची दखल घेणं भाग पडलंय. कालच्या मूकपदयात्रेला जनक्षोभ बघून मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उद्या मुंबईत बैठकीचं आयोजन केलंय. सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या बैठकीला कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील आजी माजी लोकप्रतिनिधी, मठाचे प्रमुख आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित राहणारयत. या बैठकीत महादेवीच्या घरवापसी बाबत नेमकी काय चर्चा होते याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.