भारताचे जवान आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य

पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले, सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला..मग क्रिकेट कशासाठी?

<p>भारताचे जवान आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य</p>

"जेव्हा आपल्या भारतीयांच्या आणि जवानांच्या रक्तापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूरबाबत ढोंगीपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे आणि प्रिय बीसीसीआय, हे फक्त ब्लड मनी नाहीत जे तुम्ही कमवू इच्छित आहात, तर ते शापित पैसे देखील आहेत." असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले. सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आलाय. मात्र दोन्ही देशांत तणाव असून देखील आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आमने-सामने येणारय. आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबीमधील स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणं अधिकृतपणे जाहीर केलंय. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी सामना होणारय. यानंतर काही तासांतच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे  ट्वीट केलंय. भारताचे जवान आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य देण्यात आलंय असा आरोप त्यांनी केलाय. तसंच त्यांनी याला 'ब्लड मनी' म्हटलंय.