मुक पदयात्रेत मोठा जनसमुदाय लोटला...   

आमची माधुरी परत द्या, हेच आमचे उत्तर : राजू शेट्टी

<p>मुक पदयात्रेत मोठा जनसमुदाय लोटला...   </p>

कोल्हापूर – “नांदणी मठात माधुरी हत्तीणीला परत पाठवा” या मुख्य मागणीसाठी नांदणी ते कोल्हापूर अशा  मुक पदयात्रेला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून या पदयात्रेत मोठा जनसमुदाय सहभागी झाला आहे.

यावेळी “आमची माधुरी परत द्या, हेच आमचे उत्तर” असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. आता राष्ट्रपतीच यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. कायद्यानुसार एखाद्याला फाशी झाली तर राष्ट्रपतीच यामध्ये हस्तक्षेप करून निर्णय बदलू शकतात तर  त्याच पद्धतीने राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नियम धाब्यावर बसून माधुरीला नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

हत्तीणी जाताना रडत गेली आहे. त्यामुळे तिच्यावतीने आम्ही राष्ट्रपतींना एक दयेचा अर्ज आज देणार आहोत. तो अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.