कळंबा ग्राम तलावातील नवीन पाण्याचं विधीवत पूजन

कोल्हापूर – कोल्हापूरातील कळंबा ग्राम तलावातील नवीन पाण्याचं वेदमंत्रात विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
कोल्हापूरातील कळंबा ग्राम तलावातील नवीन पाण्याचं वेदमंत्रात विधिवत पूजन करण्यात आलं. सुरवातीला कळंबा ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पूनम जाधव आणि त्यांचे पती उत्तम जाधव यांच्या हस्ते कलश वरुणाची स्थापना करण्यात आली. यावेळी पुजारी अमर कुलकर्णी यांनी पंचशब्दी पुण्यवाचन केलं. त्यानंतर विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कळंबा तलावात शुभफल सोडून पाण्याचं विधिवत पूजन करण्यात आलं.
यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव, उप सरपंच पूनम जाधव, माजी सरपंच सागर भोगम, करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील, ग्रामविकास अधिकारी विलास राबाडे, ग्रामपंचायतीचे सदस्य विकास पोवार, संदीप पाटील, उदय जाधव, मीना गौड, आशा टिपुगडे, रोहित जगताप, संगीता माने, रोहित मिरजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.