कोल्हापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय !

‘या’ दिवसापासून कोल्हापूरात सुरु होणार ‘मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच’

<p>कोल्हापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय !</p>

सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच म्हणून मान्यता दिलीय. या निर्णयास महाराष्ट्र राज्यपालांचीही मान्यता मिळालीय. त्यामुळं आता मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच थेट कोल्हापुरात कार्यरत राहणारय. न्याय प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्यानं नागरिकांना आता न्यायासाठी मुंबई, नागपूर किंवा औरंगाबादला जाण्याची गरज नाही. कामकाजाला प्रत्यक्षात १८ ऑगस्ट २०२५ सुरु होणार असल्याची माहिती समोर येतीय.