महादेवीला परत पाठवण्यास वनतारा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल : पालकमंत्री

कोल्हापूर – नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकीनंतर जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे माध्यमांशी काहीही न बोलता बाहेर पडले. यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीण परत आणण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. जनभावना लक्षात घेवून महादेवीला परत पाठवण्यास वनतारा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.