महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार : राजू शेट्टी
तीन ऑगस्टला मूकमोर्चा काढणार

कोल्हापूर - सुपारी घेऊनच महादेवी हत्तीणला वनताराकडे पाठवण्यासाठी, हाय पॉवर कमिटी काम करत होती, अशी शंका माजी खासदार राजू शेट्टींनी व्यक्त केलीय. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली महादेवी हत्तीणला परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यासाठी येत्या तीन ऑगस्टला नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करताना अंबानींची पाकिटे पोलिसांपर्यत आली आहेत काय? असा संशय देखील यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीची तब्येत चांगली असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पत्रे आपल्याकडे आहेत.पण केवळ पेटाच्या तक्रारी वरून महादेवी हत्तीणला वनताराकडे पाठवली जातेय. मग वनतारासाठीच पेटा काम करत होतं का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. पेटाची भूमिका प्रामाणिक असती तर त्यांनी वनतारा सोडून अन्य ठिकाणी हत्तीणं पाठवली असती. सुपारी घेऊनच महादेवी हत्तीणं वनताराकडे पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटी काम करत होती अशी शंका यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस जर दडपशाही करत असतील तर पोलिसांनी हीच तत्परता जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच अंबानींची पाकिटे पोलिसांपर्यत आली आहेत काय? असा संशय देखील यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.