कोल्हापुरात जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने रेड रन मॅरेथॉन संपन्न...

<p>कोल्हापुरात जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने रेड रन मॅरेथॉन संपन्न...</p>

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने कोल्हापुरात रेड रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, देशाचा कणा असलेल्या तरुणांनी समाजजागृतीसाठी अग्रेसर रहावे, असे आवाहन केले. एड्स नियंत्रणामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या रेड रन स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थि सहभागी झाले होते.

यावेळी कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल कोडोलीकर, निवासी बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सीपीआरमधील समाजसेवा विभागाचे प्रमुख शशिकांत राऊळ, महेंद्रसिंह चव्हाण, कोल्हापूर फर्स्टचे अॅडव्होकेट सर्जेराव खोत, सचिन शानभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे अधिकारी शरद आजगेकर, संदीप पाटील, संजय गायकवाड, दीपक सावंत, यांच्यासह एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी आणि एड्स नियंत्रण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.