अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाच्या वतीने राजर्षी शाहू विद्यामंदीर परिसरात वृक्षारोपण

<p>अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाच्या वतीने राजर्षी शाहू विद्यामंदीर परिसरात वृक्षारोपण</p>

कोल्हापूर - अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाच्या वतीने कसबा बावडा येथे राजर्षी शाहू विद्यामंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. डॉक्टर प्रवीण नेजदार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा कोल्हाटी,डोंबारी समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम लाखे यांनी शाळेला देशी वृक्ष दिले. यावेळी  माजी पोलीस अधिकारी पांडव, केंद्र शाळा मुख्याध्यापक डॉक्टर अजित कुमार पाटील, अक्षय सुतार, रवी लाखे, चंद्रकांत लाखे ,सुरेश लाखे, विकास करपे, सहाय्यक शिक्षिका विद्या पाटील,दिपाली यादव आणि तमेजा मुजावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कुंभार यांनी तर आभार आर जी. कीर्तिकर यांनी मानले.