जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेला सुरूवात...

कोल्हापूर - आज जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगलीहून हजारो भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. आज रात्रभर जोतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
यात्रेनिमित्त जोतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठी पूजा आणि चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोषाख अर्पण करतात धुपारती सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे.