कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये रिक्त पद भरतीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा, कार्यकर्त्यांना आवाहन
पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

कोल्हापूर - राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करत असल्याची माहिती दिली. ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि न्यायपूर्ण पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची एक उच्चस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षातील निष्ठावान आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही समिती जिल्ह्यातील १२ तालुका अध्यक्ष आणि विविध सेलच्या प्रमुखांशी समन्वय साधून त्यानंतर इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये पूर्ण करून इच्छुकांच्या मुलाखती 17 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात येणार आहेत.
"कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यके गावात, वाड्यावस्तीवर कोणताही राजकीय लाभ न घेता काम करताना आपल्याला दिसतात. अनेक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना संघटनेत योग्य स्थान आणि जबाबदारी देणे हे आमचे कर्तव्य आहे. या नवनियुक्त पदकार्याभारामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आमची संघटना पूर्ण ताकदीने सज्ज होईल" असे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील म्हटलंय.
✓ कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन-
कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या महिला, युवक, एनएसयूआय, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, पर्यावरण विभाग, असंघटीत कामगार विभाग, किसान व खेत मजदूर कॉंग्रेस, भटक्या जाती व विमुक्त जमाती, विधी मानव अधिकार, माहिती अधिकार, विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग, उद्योग व वाणिज्य विभाग, डॉक्टर सेल, घरेलू कामगार सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सफाई कामगार सेल, सहकार सेल, रोजगार स्वयंरोजगार विभाग, सांस्कृतिक सेल लोक कलावंत विभाग, परिवहन विभाग, सांस्कृतिक सेल, औद्योगिक सेल, प्रोफेशनल कॉंग्रेस, नागरी विकास सेल, कामगार सेल, शिक्षक सेल, वक्ता सेल, रास्त धान्य दुकानदार सेल, माथाडी कामगार मेल, क्रीडा युवक सेल, सुरक्षा रक्षक सेल, राजीव गांधी पंचायती राज संघटन, माजी सैनिक विभाग, सेवादल अशा विविध विभागासाठीच्या नवीन पदाधिकारी नियुक्तीच्या या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्याच्या तालुका अध्यक्षांशी किंवा थेट जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाशी संपर्क साधावा. ही केवळ पदभरती नसून, पक्षाच्या पुनर्बांधणीत सक्रिय योगदान देण्याची एक सुवर्णसंधी आहे. जास्तीत जास्त कार्यकत्यांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
✓अधिक माहितीसाठीः
1) विजयानंद पोळ
मोबाईल क्रमांक: 9881919599
(2) संजय पोवार वाईकर
मोबाईल क्रमांक: 9767389911