“तुम्हाला काय माज आला आहे...”

अजित पवार गटाच्या आणखी एका आमदारांची जीभ घसरली 

<p>“तुम्हाला काय माज आला आहे...”</p>

नाशिक – अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे  बेताल वक्तव्य राज्यभर चर्चेत असताना आता आणखी एका नाशिकच्या आमदारांची जीभ घसरली आहे.
 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी, अधिकाऱ्यांना दम देत 'तुम्हाला काय माज आला आहे एवढा, तुमचा माज मी जिरवतो. मला च्युXX काढता का ?, असे वक्तव्य केले आहे. 
आमदार नितीन पवार हे कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत होते. या आंदोलनाला  संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने आमदार नितीन पवार हे चांगलेच संतापले आणि त्यांची जीभ घसरली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही मटका, दोन नंबर हे कुठलेच धंदे इथे चालू देवू नका. मला सगळे धंदे बंद पाहिजे, असा दमही दिला. त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांचे नेमकं काय चाललंय?,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही काय ? असे सवाल आता उपस्थित होवू लागले आहेत.