'महादेवी हत्तीण' प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय
नांदणीकरांना धक्का

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टाने 'महादेवी हत्तीण' प्रकरणी निकाल दिला आहे. या निकालाने नांदणीकरांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने 'महादेवी हत्तीणी' स गुजरातच्या जामनगरमधील अंबानींच्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले होते. या आदेशा विरोधात नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महास्वामींची मोठी निराशा झाली आहे. यावर मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो आम्हाला मान्य असून यावर मी जास्त काही बोलणार नाही, असे म्हटले आहे.