मुंबईत ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी भाजपची रणनीती

<p>मुंबईत ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी भाजपची रणनीती</p>

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून सर्वच राजकीय पक्षांचं या निवडणुकीकडं लक्ष लागून राहिलंय. निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आलाय. राज्यात सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई मध्ये वेगवेगळी राजनीती वापरण्याची शक्यता आहे. मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मनोमिलन झालंय. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्रित आले पाहिजे अशी सर्वसामान्य मराठी माणसांची भावना आहे. त्यात राज-उद्धव यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता आहे. दोघां भावांमध्ये युती झाल्यास आगामी काळात भाजपची डोकेदुखी वाढवणाय. त्यामुळ भाजप महायुतीसह लढण्याच्या तयारीत आहे.