राधानगरी धरणातून विसर्ग सुरु... 

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे... 

कोल्हापूर – जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फुट १० इंच होती तर जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फुट असून सद्या नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु झाली आहे.

#पचगंगा_नदी #राधानगरी_धरण