जिल्ह्यात संततधार सुरु  

वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

<p>जिल्ह्यात संततधार सुरु  </p>

कोल्हापूर – जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 
वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून  11 हजार 900 क्युसेक्स आणि विद्युत गृहातून 1 हजार 630 क्युसेक असा एकूण 13 हजार 530 क्युसेकने विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.