हर्षल पाटील या ठेकेदाराला मारण्याचे पाप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलंय : राजू शेट्टी 

<p>हर्षल पाटील या ठेकेदाराला मारण्याचे पाप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलंय : राजू शेट्टी </p>

कोल्हापूर - आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करायच्या आता ठेकेदार करायचे. अजून किती हर्षल पाटलांचा बळी जाणार हे माहिती नाही परंतु या हर्षल पाटील या ठेकेदाराला मारण्याचे पाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तुम्ही मंडळींनी केला आहात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. 
जल जीवन मिशनच्या केलेल्या कामाच्या पैशासाठी त्यांनी आपले खेटरं झिझवली. परंतु सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणता, मग नको असलेली शक्तीपीठ महामार्ग टक्केवारीसाठी का करता, त्यातीलच पैसे त्या ठेकेदाराला का दिले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

निवडणुकीत सरकारी तिजोरीतील पैसा  मतदारांना भूलवून तुम्ही सत्तेत आलात त्याची ही विषारी फळे आता दिसतायेत असे सांगून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक मालमत्तावर कर्ज काढून या ठेकेदारांची बिले भागवावीत आणि  या आत्महत्येचे उत्तर द्यावे  अशी मागणीही त्यांनी केली आहे.