इचलकरंजीतील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका अॅक्शन मोडवर...

<p>इचलकरंजीतील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका अॅक्शन मोडवर...</p>

इचलकरंजी - इचलकरंजी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. महानगरपालिकेने अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा फेरीवाले अतिक्रमण करतात. रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना त्रास होतो. शिवाय वाहतुकीसही अडथळा होतो त्यामुळे आज इचलकरंजी उपायुक्त विदयाधर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवण्यात आली. त्यानुसार शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याच्या शंभर मीटर परिसरातील आणि मुख्य मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण केल्यास व्यवसाय परवाना रद्द करण्याचा इशारा उपायुक्त कदम यांनी दिला आहे. अतिक्रमण निमुर्लन प्रमुख सुभाष आवळे आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.