आळतेमध्ये पावणे नऊ लाखाचा मद्यसाठा जप्त...
राज्य उत्पादनची कारवाई

कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक महेश गायकवाड यांना हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका घरात देशी विदेशी मद्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून पावणे नऊ लाखाचा मद्यसाठा आणि दुचाकी असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत राजकुमार अशोक घाटकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. दुय्यम निरीक्षक कोमल यादव, रुपाली क्षिरसागर, शिवाजी गायकवाड, सागर शिंदे, सुशांत बनसोडे यांच्यासह भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.