उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?...  उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

<p>उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?...  उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल</p>

मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झालाय. यामध्ये निवडणूक आयोगासह सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिवसेनेचे अस्तित्व कधी संपवू शकत नाहीत. इतकी वर्ष होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकले नाहीत, असं त्यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोग आमचं निवडणूक चिन्ह गोठवू शकतो अथवा दुसऱ्याला देऊ शकतो, परंतु शिवसेना हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार त्यांना नाही. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? असा उद्धव ठाकरेंनी खोचक सवाल विचारलाय. या धोंड्याला पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत खेचाखेची झाली, त्यावेळी आम्ही अनेकदा जिंकलेले मतदारसंघ निवडणूक जिंकायची म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या निवडणुकीत देखील शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. याचा

 लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसच त्यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत निवडणुकीच्या मतदानावर प्रश्नचिन्ह उभं केलंय.