केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी...

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी गुरूवारी सायंकाळी पाहणी केलीय. यावेळी अधिकाऱ्यांसोबत कामाबाबत चर्चा करून त्यांनी आढावा घेतलाय. यानंतर खासबाग मैदानाचीही त्यांनी पाहणी केलीय. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, व्यवस्थापक समीर महाब्री, श्री लक्ष्मी हेरिकॉनचे प्रतिनिधी श्रीनिवास पाटील आणि व्ही. के. पाटील उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील काम दर्जेदार करावीत अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. नाट्यगृह कायमस्वरूपी उपयोगात येणार असल्यानं गुणवत्ता आणि टिकाऊपणा आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील अंतर्गत सजावट, ध्वनी प्रणाली, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि वातानुकूलित यंत्रणेची कामं मंजूर झाली असल्याची माहिती शहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिलीय.