कोल्हापुरी चप्पल नक्कल प्रकरणी याचिकाकर्त्यांची हायकोर्टात धाव
..

कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी इटालियन फॅशन ब्रँड प्राडा या कंपनीने आपल्या एका कार्यक्रमात कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून ‘टो रिंग सैंडल्स’ नावाने उत्पादन बाजारात आणले. यावेळी त्यांनी कोल्हापूरचा उल्लेख देखील केला नाही. कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरची ओळख आहे त्यामुळे कोल्हापूरचा तसेच कोल्हापूरच्या कारागिरांचा हा मोठा अपमान आहे. या विरोधात जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
इटालियन फॅशन ब्रँड प्राडा कंपनीने नक्कल केल्याप्रकरणी सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि भरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.