शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण...

बैठकीत निर्देश 

मुंबई – शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. यावर एका बैठकीदरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी, निवडणूक आणि जनगणनेचे काम शिक्षकांसाठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी म्हटले आहे कि,  मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटनामध्ये नाराजी आहे. मात्र हे काम त्यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सांभाळून ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. त्यामुळे, एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सोडून स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात कार्यरत ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.