'गुणरत्न सदावर्तेच्या कानशिलात लगावणा-याला 1 लाखाचं बक्षीस देणार…'
सदावर्तेंविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे त्यामुळे सदावर्तेंची अडचण वाढणार

मुंबई – मराठी माणसांना शिव्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेला अद्दल घडवायला हवी. त्यासाठी गुणरत्न सदावर्तेच्या कानशिलात लगावणा-याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे गटाचे प्रशांत भिसे यांनी केले आहे. सदावर्तेंविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे त्यामुळे सदावर्तेंची अडचण वाढणार आहे.
सदावर्तेंचे बोलवते धनी आणि कर्ताकरविते कोण आहे. त्यांनीही हे लक्षात घ्यावे. त्यांच्या अशा वक्तव्याने त्यांचीही प्रतिमा मलीन होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.