कोल्हापुरातील बसथांब्यांची दुरवस्था... गळतीमुळे प्रवाशांना त्रास
पावसाळ्यापूर्वी या बसथांब्यांची दुरूस्ती करणे गरजेचे होते

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेने प्रवाशांसाठी ठिकठिकाणी बस थांबे उभारलेत मात्र शहरातील काही बसथांब्यावरील पत्र्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या बसथांब्यांची दुरूस्ती करणे गरजेचे होते मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही बसथांब्यांना गळती लागली आहे. या गळतीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. बसथांब्यातच छत्री घेवून बसची वाट पाहत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे गळती लागलेल्या बसथांब्याची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.