खुपीरे येथील तरुण बेपत्ता...
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील खुपीरे येथील स्वप्निल हिंदुराव पाटील (सातवेकर) हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी करवीर पोलिसात केली आहे.
स्वप्नील हा शनिवारी (दि.२१रोजी) आपल्या घरातून बाहेर पडला आहे. मात्र त्यानंतर तो घरी परतलेलाच नाही त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली परंतु तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.