प्रा. जी. डी. यादव यांना सर पी. सी. रे पुरस्कार प्रदान  

<p>प्रा. जी. डी. यादव यांना सर पी. सी. रे पुरस्कार प्रदान  </p>

मुंबई -  प्रख्यात रासायनिक अभियंता आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबईचे माजी कुलगुरू प्रा. गणपती यादव यांना कलकत्ता विद्यापीठाच्या सिंडिकेटतर्फे प्रतिष्ठित सर पी. सी. रे पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी मानपत्र आणि सन्मान चिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. 
महान शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरक (कॅटॅलिसिस) आणि शाश्वत औद्योगिक प्रक्रियांमधील प्रा. यादव यांच्या अग्रगण्य कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.