प्रा. डॉ.जी. डी. यादव यांची प्रतिष्ठित सर पी. सी. रे पुरस्कारासाठी निवड

<p>प्रा. डॉ.जी. डी. यादव यांची प्रतिष्ठित सर पी. सी. रे पुरस्कारासाठी निवड</p>

मुंबई – रासायनिक अभियंता आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे माजी कुलगुरू प्रा. गणपती यादव यांची कलकत्ता विद्यापीठाच्या सिंडिकेट यांच्यावतीने प्रतिष्ठित सर पी. सी. रे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार आज विद्यापीठात  होणाऱ्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. महान शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरक (कॅटॅलिसिस) आणि शाश्वत औद्योगिक प्रक्रियांमधील प्रा. यादव यांच्या अग्रगण्य कार्याची दखल घेवून ही निवड करण्यात आली आहे.