सावर्डेत शॉर्टसर्किटने उसाला आग... शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

<p>सावर्डेत शॉर्टसर्किटने उसाला आग... शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान</p>

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली गावातील शेतकरी प्रकाश बच्चे यांच्या शेतात सकाळी शॉर्टसर्किट झाल्याने उसाला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच शेजारील शेतात असणारे शिवाजी पाटील आणि नितीन पाटील यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आग वाढत चालल्याने पाटील यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील रामचंद्र बच्चे, महेश बच्चे, विनोद पाटील, कृष्णात पाटील, धनाजी परिट, सुभाष गुरव, सागर बच्चे, प्रमोद पाटील, बाबासो मोरे आदी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

शेजारील अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शेतकरी प्रकाश बच्चे यांचा दोन एकरातील सुमारे १० गुंठे ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.