अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान...बागायतदारांचे लाखोंचे नुकसान
नाशिक – काल नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्षे डागाळली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे लाखांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, भिलवडी येथील द्राक्षबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.