कांद्याच्या दरात मोठी घसरण...
मुंबई - कांद्याला सरासरी ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल इतका कमी दर मिळत आहे. हा दर उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कांद्याच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दरात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा दरातील घसरण थांबविण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.