तुम्ही शेतातील रस्ता अडवलाय काय...मग तुमचं आधार कार्ड, फार्मर आयडी होणार ब्लॉक ; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

<p>तुम्ही शेतातील रस्ता अडवलाय काय...मग तुमचं आधार कार्ड, फार्मर आयडी होणार ब्लॉक ; राज्य सरकारचा मोठा निर्णय </p>

मुंबई – तुम्ही शेतातील रस्ता अडवलाय काय..? तर मग ही बातमी तुम्ही जाणून घ्या, कारण रस्ता अडवला असल्यास तुम्हाला सरकारी योजनांच्या सवलतीपासून मुकावं लागणार आहे. 

शेतरस्ते अडवणाऱ्यांना थेट 5 वर्षे सरकारी योजनांसाठी अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.  यासंदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, शेत रस्त्यासाठी वाद घालणाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.