कोल्हापुरात शनिवारी आणि रविवारी कंदमुळाचे प्रदर्शन...

<p>कोल्हापुरात शनिवारी आणि रविवारी कंदमुळाचे प्रदर्शन...</p>

कोल्हापूर - निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर, वुई केअर आणि एनजीओ कम्पेंशन ट्रेंटी फोर या संस्थांच्यावतीने कोल्हापूरातील दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात येत्या शनिवारी आणि रविवारी कंदमुळांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वुई केअरचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आणि महापौर रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये कणगा, काटे कणंग, कोराडू ,करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, हवाई बटाटे, कंदीका, कंदक अशा २५० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती आणि प्रजातींचा समावेश असणार आहे. प्रदर्शनात कंदमुळांपासून बनवल्या जाणाऱ्या विविध खाद्य पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

 या पत्रकार परिषदेला निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली, कंदमुळांचे अभ्यासक मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.