शेतीला दिवसा वीजपुरवठा करा : काखेमधील शेतकऱ्यांची मागणी
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील काखे गावात बिबट्याचा वावर वाढत आहे. काही दिवसापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वीस शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. वारणा नदी काठावर गावातील महिलांना बिबट्या दिसल्यापासून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जायला धजावत नाहीत. त्यामुळे शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्यावतीने महावितरणला याबाबतचे निवेदन देण्यात आले असून याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.