ऊसतोड कामगारांच्या १९ प्रकरणांना मंजुरी...

<p>ऊसतोड कामगारांच्या १९ प्रकरणांना मंजुरी...</p>

कोल्हापूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या आर्थिक सहाय्यासंबंधी १९ प्रकरणांना आज मंजुरी देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित सात प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून ते प्रस्ताव पुन्हा बैठकीसमोर सादर करावेत, असे निर्देश दिले. तसेच ऊसतोड कामगारांच्या संदर्भात व्यापक सर्वेक्षण करता येईल का, याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर आढावा सादर केला.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, सीपीआर येथील डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, महिला व बालविकास विभागाच्या नीलम धनवडे, माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शुभम पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त भि. धो. धर्मेकर तसेच प्रादेशिक साखर कार्यालयाच्या सुप्रिया आरेकर आदी उपस्थित होते.