'डी. वाय' ची १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिलं बँक खात्यावर जमा : आ. सतेज पाटील

<p>'डी. वाय' ची १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिलं बँक खात्यावर जमा : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर -  गगनबावडा तालुक्यातील असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील एक जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ या पंधरवड्यात ६१ हजार ७६१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे.  तीन हजार ४५० रूपये प्रमाणं होणारी ऊस बिलाची २१ कोटी २० लाख ४६ हजाराची रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलीय, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.

 कारखान्याने पंधरा फेब्रुवारीअखेर ४ लाख ३ हजार ८३० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून तीन लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आजअखेर तीन कोटी ८७ लाख २७ हजार ४० युनिट विजेची निर्मिती केली असून यातून कारखान्याचा वापर वजा जावून २ कोटी ५८ लाख ५८ हजार युनिट वीज निर्यात केली आहे.