साबळेवाडीत शेती पंप चोरीचा धडाका...शेतकऱ्यांमध्ये संताप
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील साबळेवाडी गावात शेती पंप चोरीस जाण्याचे प्रमाण खूप वाढल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. या वाढत्या शेती पंप चोरीच्या धडाक्यामुळे शेतकऱ्यांमधून मनस्थाप व्यक्त होत आहे.
यामध्ये जी डी पाटील यांचा १५ एचपी ,संभाजी बापू साबळे पाच एचपी ,दिनकर दादू चौगले पाच एचपी आदीचे पंप चोरीला गेले आहेत. हे सर्व पंप भोगावती नदी काठावरून चोरीला गेले आहेत. यापूर्वी भामटे,दोनवडे आणि आता साबळेवाडी येथे शेती पंपाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.