"खड्ड्यात पणत्या आणि रांगोळी!" – ठाकरे गटाचं महापालिकेविरुद्ध अनोखं आंदोलन

<p>"खड्ड्यात पणत्या आणि रांगोळी!" – ठाकरे गटाचं महापालिकेविरुद्ध अनोखं आंदोलन</p>

 

कोल्हापूर - कोल्हापूर शहराला खड्ड्यांच्या शहरात रूपांतरित करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरली. दिवाळीच्या मध्यरात्री रस्त्यांवरील खड्ड्यांत पणत्या लावून आणि रांगोळ्या रेखाटून महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलं.

कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी भरले असून, दिवाळीच्या पहाटे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. महापालिकेला वेळोवेळी निवेदन, घेराव आणि मोर्चा अशा माध्यमातून जागं करण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाने याआधी केला होता. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अद्यापही निष्क्रिय असल्याने दिवाळीच्या पहाटे एक अनोखं आंदोलन छेडण्यात आलं. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांत पणत्या लावून आणि त्याभोवती रांगोळ्या रेखाटून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान महापालिका आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली.

यावेळी विशाल देवकुळे , सागर साळोखे , हर्षल पाटील ,पप्पू नाईक , समरजित जगदाळे , अमित पै, गोविंद वाघमारे, विकास बुरबुसे, संजय खराटे, जयंवत पाटील रुद्र पाटील, भूषण मिटके, सुकुमार लाड, सुरज कांबळे, आकाश जळग, दिपक बूळूके, संदीप देवकुळे, सचिन कांरडे, विक्रम पाटील , प्रभाकर पाटील, शैलेश हिरास्कर यांच्यासह शिवसैनिक व रहिवाशी उपस्थित होते.