डॉ. सोनम वांगचुक यांची सुटका करण्याची मागणी...

 

 

डॉ. सोनम वांगचुक यांची अटक संविधान विरोधी : आम्ही भारतीय लोक आंदोलन

<p>डॉ. सोनम वांगचुक यांची सुटका करण्याची मागणी...</p>

<p> </p>

<p> </p>

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षण तज्ञ, पर्यावरण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक केलीय. त्यांच्या अटकेनंतर त्यांचा कुटुंबीयांशी किंवा इतर कोणाशीही संपर्क झालेला नाहीय. त्याचबरोबर लडाख मध्ये संचारबंदी लावण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय. केंद्र सरकारची ही कृती हुकूमशाही प्रवृत्तीची तर आहेच पण ती संविधान विरोधी, देश विरोधी आणि मूलभूत नागरी हक्कांची पायमल्ली करणारी आहे, असा आरोप आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्यावतीने करण्यात आला आहे.

आंदोलनाच्या शिष्टमंडळाने डॉक्टर वांगचुक यांची त्वरीत सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीनेही याच आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करण्यात आले आहे.

यावेळी गिरीश फोंडे, बाबुराव कदम, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, प्राचार्य टी. एस. पाटील, रवी जाधव, कादर मलबारी, प्रकाश जाधव, उत्तम पाटील, शुभम शिरहट्टी, संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, रमेश वडणगेकर, जीवन बोडके, आनंदराव चौगले, विजय अकोलकर, अभिजीत कांबळे, एस बी पाटील, राजू खद्रे, उमेश सूर्यवंशी, जयंत मिठारी, सम्राट मोरे, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.