मराठा आरक्षण मोर्चा: अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच

<p>मराठा आरक्षण मोर्चा: अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच</p>

जालना - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भव्य मोर्चा अंतरवाली सराटी (जालना) येथून मुंबईकडे रवाना झाला आहे. आज सकाळी 10 वाजता आंदोलकांनी मार्गक्रमण सुरू केलं असून, आजचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये आहे. मोर्चा राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे जात 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणारय. मात्र, याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण आदेश देत, पुढील दोन आठवड्यांसाठी कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोर्च्याच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. काही जण आज गणेश पूजनानंतर मोर्चात सहभागी होणार आहेत. उद्यापासून मोर्चाला अधिक उग्र रूप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.