रस्ता दुरवस्थेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचं 'जवाब दो या चले जाओ' आंदोलन

कोल्हापुरातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. १०० कोटींचे रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि हॉट मिक्स पद्धतीनं रस्ते तयार केल्याचे दावे केले जातायत. मात्र कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि जबाबदारीचा संपूर्ण अभाव यामुळं रस्ते खराब होतायत. पेव्हर ब्लॉक असो किंवा हॉट मिक्स कुठल्याही पद्धतीनं केलेले रस्ते केवळ काही महिन्यांत खराब होतात. यामुळं अपघात, पाठदुखी, मानदुखी, आणि इतर शारीरिक त्रास नागरिकांना सहन करावे लागतायत. याला प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार आहे. या प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीन महापालिकेसमोर 'जवाब दो या चले जाओ' आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महापालिकेचं गेट उघडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रस्ते, ड्रेनेज आणि नागरी समस्यांवर बैठक घ्यावी, दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावं, निष्क्रिय आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ८६ लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल करावेत, नगरविकास प्रशासक महिला अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचं परीक्षण करावं आदि मागण्या करण्यात आल्या या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय.
आंदोलनात उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, विराज पाटील, मंजीत माने, अवधूत साळोखे, विराज ओतारी, प्रशांत नाळे, राजू यादव, चंदू भोसले, रविभाऊ चौगुले, संतोष रेडेकर, रणजीत आयरेकर, अरुणा अबदागिरी स्मिता सावंत, दिलीप देसाई, संजय जाधव, युवराज खंडागळे, निलेश माने, संतोष रेडेकर, महेश साळोखे, बाजीराव जाधव, धनाजी दळवी शौनक भिडे, इंजमाम मुल्ला, अक्षय घाटगे, योगेश शिंदे, रितेश पाटील, छोटू करंजीकर, कुलदीप डकरे, अमित पै,तानाजी पोवार, सुमित मेळवंकी सहभागी झाले होते.