मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु
जरांगेंची मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली भेट...

बीड – उद्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. यावेळी लाखो मराठा जनसमुदाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
याचा ताण मुंबई पोलिसांवर पडणार असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.
राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मनोज जरांगे हे मुंबईकडे जाण्यास ठाम आहे. एक रस्ता आम्हाला द्या..कोणताही द्या...हजार रस्ते आहेत. एक द्या..मी मोर्चावर ठाम असून अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगेंनी म्हटले आहे. उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.