शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची युवा सेनेची मागणी

कोल्हापूर - शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्या आणि विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडे केलीय. या मागणीनुसार टवाळखोरी करणाऱ्यांवर पुढील काळात कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी युवा सेनेच्या शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापूर शहरासह उपनगरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अलीकडे टवाळखोर तरुणांची संख्या वाढली आहे. शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी टवाळखोर मुलांचे घोळके शाळा महाविद्यालयाच्या गेट बाहेर उभारलेली असतात. टवाळखोर तरुणांच्याकडून अनेकदा मुलींच्या छेडछाडीचे प्रकार देखील घडतात. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री देखील होत आहे. पोलीस प्रशासनाने शाळा महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथक आणि गस्त पथक नेमून टवाळखोरी करणाऱ्या तसेच मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांची भेट घेतली. यावेळी मागणीचे निवेदन प्रिया पाटील यांना देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांवर या पुढच्या काळात कारवाई करू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनजीत माने, पवन तोरस्कर, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शैलेश नलावडे, अक्षय घाटगे, लतीफ शेख, शुभम पाटील, सनराज शिंदे, सानिका दामूगडे, माधुरी जाधव, तृप्ती विभूते, प्रज्ञा लोनारे
आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.