श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस शिक्षण संस्थेच्या कारभाराविरोधात निदर्शने

कोल्हापूर – शहरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या नामांकित शिक्षण संस्थेवर गेल्या काही महिन्यांपासून लोककल्याण फाऊंडेशन सुहास साळोखे, कॉ. चंद्रकांत यादव, विजय साळोखे, संजय पडवळ, जगन्नाथ सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज लोककल्याण फौंडेशनच्या वतीने आज संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.
यावेळी लोककल्याण फौंडेशनचे सुहास साळोखे यांनी, नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गेल्या पाच वर्षांपासून संस्थेची सर्वसाधारण सभा झाली नसल्याचा आरोप केला. डोंगरी दाखल्याच्या आधारे मुदतवाढ दिलेल्या प्राचार्यांना शहरी भागा प्रमाणे पगार देण्यात आल्याचा आरोप सुध्दा यावेळी केला.
कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी, संस्थेच्या प्रत्येक गोष्टीत कमिशनगिरी, संस्थेच्या पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप केला. निदर्शनांमध्ये संजय पडवळ, प्रकाश आमटे, जयंत मिठारी, कॉ. अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.