गणेशोत्सवापूर्वी इचलकरंजीतील रस्ते दुरुस्त करण्यासह, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मनसेची मागणी

<p>गणेशोत्सवापूर्वी इचलकरंजीतील रस्ते दुरुस्त करण्यासह, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मनसेची मागणी</p>

इचलकरंजी - शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालीय. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करावी आणि सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, अशी मागणी मनसेने केलीय. आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रतापराव पाटील, राजेंद्र निकम, नितीन फडके यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.