‘महादेवी’साठी आत्मक्लेष पदयात्रा कोल्हापुरात दाखल...

<p>‘महादेवी’साठी आत्मक्लेष पदयात्रा कोल्हापुरात दाखल...</p>

कोल्हापूर – पहाटे पाच वाजल्यापासून महादेवी हत्तीणीसाठी नांदणीकरांसह अनेक लोक मूक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा आता कोल्हापुरात दाखल झाली आहे. 
45 किलोमीटरचे अंतर पार करून मोठा जनसमुदाय कोल्हापुरात दाखल झाला आहे. कोल्हापूर - सांगली महामार्गावरून निमशिरगाव फाटा, तमदलगे, हातकणंगले, हेरले, शिरोली फाटा या मार्गे तावडे हॉटेल येथे आला आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 
माधुरी परत करा, जिओ बायकॉट अशा आशयाची पांढरी टोपी परिधान केली आहे. मार्गावर अनेक सामाजिक संघटनाकडून पिण्याचे पाणी, बिस्कीट, केळी आदींचे वाटप करण्यात येत आहे.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.