"त्या" गुंडप्रवृतीच्या रिक्षा चालकावर कारवाई करा : महाराष्ट्र रिक्षा चालक सेना

<p>"त्या" गुंडप्रवृतीच्या रिक्षा चालकावर कारवाई करा : महाराष्ट्र रिक्षा चालक सेना</p>

कोल्हापूर - ४ एप्रिलला कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात अमोल खर्जे उर्फ आबड्या याने प्रकाश पोवार या रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला केला होता. हा आरोपी शहरातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी मारहाण, दंगा आणि धमकीसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. असे असतानाही पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई का केली नाही, असा सवाल महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे शहरप्रमुख राजू पोवार यांनी आज पत्रकार बैठकीत उपस्थित केला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याला रिक्षा लायसन्स, परमिट आणि बॅच कसे मिळाले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पोलिसांनी या आरोपीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पोवार यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.