कोल्हापुरात अशोक खरात विरोधात भाकपचे आंदोलन

<p>कोल्हापुरात अशोक खरात विरोधात भाकपचे आंदोलन</p>

कोल्हापूर - अशोक खरात हा भोंदुगिरीच्या नावाखाली महिलांचे शोषण करत असल्याने राज्यभर त्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. खरात प्रकरणी काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सार्वजनिक पदांवरील व्यक्तींचाही संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खरात विरोधात आज राज्यभरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात खरात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खरात आणि त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करावी, संबंधित प्रकरणात सामील असलेल्या आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत, पीडित महिलांचे व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावरून हटवावे, राज्यभर भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करावा. आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, शंकर भाटाळे, दिनकर आदमापुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.