चंदगड मधील 'त्या' डॉक्टरांवर कारवाई करा : वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी

<p>चंदगड मधील 'त्या' डॉक्टरांवर कारवाई करा : वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी</p>

कोल्हापूर -  चंदगड येथील डॉ. जी एम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन  वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना देण्यात आले.

चंदगड येथे डॉ. जी एम पाटील यांचा दवाखाना आहे. चंदगड तालुक्यातील कोळींद्रे खालसा येथे लक्ष्मण कांबळे हे दीड वर्षांपूर्वी आजारी असल्याने ते उपचारासाठी डॉक्टर जी.एम. पाटील यांच्याकडे गेले होते. यावेळी डॉक्टर पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने कमरेत गाठ होऊन त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आल्याची तक्रार कांबळे यांनी केली होती. या तक्रारीनंतर डॉक्टर पाटील यांची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. मात्र समितीचा अहवाल प्राप्त होऊन अद्यापही डॉक्टरांवर कारवाई झालेली नाहीय. त्यामुळे आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांची भेट घेतली.

यावेळी मागणीचे निवेदन डॉ. वाडीकर तसेच राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना देण्यात आले. या प्रसंगी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, अर्जुन वाघमारे, सतीश दुधगावकर, राजू कांबळे आदि उपस्थित होते.