राज्यातील गॅस टंचाईवर काँग्रेसचे विधानभवन परिसरात आंदोलन...

<p>राज्यातील गॅस टंचाईवर काँग्रेसचे विधानभवन परिसरात आंदोलन...</p>

मुंबई – राज्यात सुरु असलेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर आज विधानभवन परिसरात काँग्रेसच्या वतीने  जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. विजय वड्डेटीवार आणि आ. नाना पटोले यांनी हातात सरेंडर दे सिलिंडर, असे पोस्टर घेऊन सरकारवर टीका केली. ‘सरकारच्या पापाचा परिणाम जनतेला भोगावा लागतोय’, असा आरोप यावेळी त्यांनी केला.